Amul Milk Price Hike : अर्थसंकल्पानंतर सामान्यांना फटका; अमूलच्या दुधाच्या किमतीत वाढ

Amul Milk Price Hike : अर्थसंकल्पानंतर सामान्यांना फटका; अमूलच्या दुधाच्या किमतीत वाढ

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 दोन दिवसांपूर्वीच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पानंतर सर्वसामन्यांना महागाईला सामोरे जावे लागते आहे. कारण नुकताच अमुलने आपल्या सर्व उत्पादनाच्या किमतीत 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. (Amul Has Increased Prices Of Amul Pouch Milk All Variants By Rs 3 Per Litre)

अमिलच्या नवीन दरांनुसार, नव्या घोषणेनंतर ग्राहकांना अमूल गोल्डसाठी 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेशसाठी 54 रुपये प्रति लीटर पैसे मोजावे लागणार आहेत. तर, अमूल गायीच्या दूधासाठी 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दूधासाठी 70 रुपये प्रति लीटर मोजावे लागणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

पराग मिल्क फूड्सकडून गोवर्धन ब्रँडच्या दरात 2 रुपयांनी वाढ

गुरुवारी डेअरी फर्म पराग मिल्क फूड्सने गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली होती ज्यामुळे ऑपरेशनचा खर्च आणि दूध उत्पादन वाढले होते. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, दरात वाढ झाल्याने गोवर्धन गोल्ड दुधाची किंमत आता प्रति लिटर 54 रुपये वरून 56 रुपये झाली आहे. पराग मिल्क फूड्सचे चेअरमन देवेंद्र शहा म्हणाले की, ऊर्जा, पॅकेजिंग आणि पशुखाद्याचा खर्च वाढल्याने दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.


हेही वाचा – महापुरुषांचा वारसा जपणाऱ्या वर्धा नगरीत साहित्यिकांची मांदियाळी, आजपासून 96वे मराठी साहित्य संमेलन

First Published on: February 3, 2023 9:56 AM
Exit mobile version