अनंत करमुसे मारहाण प्रकरण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक अन् जामीन

अनंत करमुसे मारहाण प्रकरण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक अन् जामीन

अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही तासांपूर्वी ट्वीट करून दिली. मात्र त्यानंतर ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिल्याची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आज दुपारी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर दुपारी ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांचा जामीन मंजूरही केला.

अनंतर करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम ३६५, ३२४, १४३, १४७, १४८, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेऊन वर्तकनगर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर आव्हाड यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. ठाणे न्यायालयाने आव्हाड यांना १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

याबाबत किरीट सोमय्या काय म्हणाले? 

गेले १४ महिने ठाकरे सरकारला जितेंद्र आव्हान यांना वाचवत होती. अखेर गुंड मंत्री जितेंद्र आव्हाड याची अटक झाली. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नये. या माणसाने मंत्री असून अपहरण केले, मारहाण केली. सव्वा वर्षानंतर न्यायालयाने न्याय देऊन जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली आणि शेवटी करमुसेला न्याय मिळाला, असे भाजप नेते किरीट सोमय्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

काय आहे प्रकरण? 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्यावेळी मंत्री आव्हाड तिथे उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस शिपायांनी नेले होते. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती.


हेही वाचा – पाहुणे माझ्याकडे नव्हे आमच्या नातेवाईकांकडे आले होते, IT छापेमारीवर अजित पवारांची


 

First Published on: October 14, 2021 10:53 PM
Exit mobile version