सूनबाईंच्या विजयी वाटचालीवर रमेश लटकेंचे वडिलांना आली लेकाची आठवण म्हणाले….

सूनबाईंच्या विजयी वाटचालीवर रमेश लटकेंचे वडिलांना आली लेकाची आठवण म्हणाले….

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. अशा रविवारी (6 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आत्तापर्यंतच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. दरम्यान या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे मतमोजणीच्या काही तासांनंतरचं शिवसेनेच्या ठाकरे गटात आनंदाचे वातावरण दिसतेय. याच पार्श्वभूमीवर आज ऋतुजा लटके यांचे सासरे कोंडिराम लटके यांनी ठाकरे गटाचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला. ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सूनबाई ऋतुजा लटके यांच्या विजयी वाटचालीवर सासरे कोंडिराम लटके यांना आपल्या लेकाच्या आठवणीने गहिवरून आले.

यावेळी रमेश लटके यांचे वडिल म्हणाले की, माझ्या सूनेला मिळत असलेले यश हे जनतेच्या जीवावर आहे. ती या निवडणुकीत नक्कीच निवडून येईल. तिने निवडून आल्यावर आपल्या पतीने केलेली कामं पुढे न्यावीत. जनतेशी चांगल्याप्रकारे राहावे, असही कोंडिराम लटके म्हणाले.

माझा मुलगा रमेश लटके यांने अंधेरी पूर्व मतदारसंघात जी कामं केली होती, त्यामुळे जनतेचा त्याच्यावर असलेला विश्वास हा निकालात दिसून येत आहे. माझ्या सूनेने हीच पंरपरा पुढे न्यावी. तिने चांगली काम करावीत. अडीअडचणीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जावे, असा सल्लाही त्यांनी दिली.

आज सकाळी आठ वाजल्यापासून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली, आत्तापर्यंत 12 फेऱ्या पार पडल्या. यामध्ये ऋतुजा लटके यांनी 45218 मतं पडली, यात अपक्षांना मागे टाकत नोटा पर्यायाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळावी आहे. सध्याच्या परिस्थितीत ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.


बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला अटक

First Published on: November 6, 2022 12:44 PM
Exit mobile version