ईडीने अनिल देशमुख यांच्याकडे मागितल्या ‘या’ पाच गोष्टी

ईडीने अनिल देशमुख यांच्याकडे मागितल्या ‘या’ पाच गोष्टी

Money Laundering Case: मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुखांचा जामीन अर्ज दाखल; बुधवारी सुनावणी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र वयाचं आणि आजारपणाचं कारण देत चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. दरम्यान, या प्रकरणी ईडीने यांच्याकडे पाच गोष्टींची मागणी केली आहे. अनिल देशमुखांनी पत्राद्वारे माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी केली होती.

ईडीने मागितल्या ‘या’ पाच गोष्टी

१) श्री साई शिक्षण संस्थेला मिळलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या डोनेशन्सची माहिती.

२) अनिल देशमुख यांच्या मागच्या पाच वर्षांच्या इन्कम टॅक्स डिटेल्स.

३) देशमुख यांच्या सर्व संपत्तीचे डिटेल्स.

४) आरोपी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची पूर्ण माहिती, ते कधीपासून देशमुख यांच्यासोबत होते? किती काळ आणि त्यांच्यासोबत काही व्यवहार झालेत का त्याचीही माहिती.

4) श्री साई शिक्षण संस्थेमध्ये एकूण किती डायरेक्टर आहेत. कुणाचा काय रोल आहे, पैसे कधी किती आले आणि आतापर्यंत ते कुठे खर्च झाले त्याची माहिती.

अनिल देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स जारी झाल्यानंतर त्यांना ही माहिती घेऊन ईडी अधिकाऱ्यासमोर जावं लागेल.

अनिल देशमुखांना या गोष्टी अडचणीच्या ठरणार?

 

First Published on: June 29, 2021 5:12 PM
Exit mobile version