‘अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत’

‘अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अनिल गोटे, भाजप नेते सुभाष भामरे

धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे विधामंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी रविवार, १८ नोव्हेंबर रोजी अनिल गोटे यांनी भेट घेतली असून ते राजीनामा देणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. धुळे महापालिकेची निवडणूक येत्या ९ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोटे यांचा मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. यामुळे गोटे यांनी आक्षेप घेत राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

वाचा : भाजपमध्ये बोंबाबोंब : अनिल गोटे आणि भामरे यांच्यातील वाद शिगेला

गोटे-भामरे यांच्यातील वादावर तोडगा

आज गोटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपले आक्षेप मांडले. यावर मुख्यमंत्र्यांनी अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून, धुळे महापालिकेची निवडणूक गोटे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, असे जाहीर केले. सुभाष भामरे यांच्यासह इतर नेते त्यांना निवडणुकीवेळी मदत करतील. गोटे यांचे आक्षेप आपण ऐकून घेतले असून त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रभारी यांच्याशी चर्चा करतील, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वाचा : १९ नोव्हेंबर अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार

गोटेंनी राजनामा देण्याचे गेले जाहीर

काही दिवसांपूर्वी अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपला धक्का बसला होता. अनिल गोटे यांनी येत्या १९ नोव्हेंबरला आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. धुळ्यामध्ये महापौरपदावर अनिल गोटे यांनी दावा केला. धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेमध्ये स्वत: अनिल गोटे यांनी महापौर पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवल्यामुळे अनिल गोटे नाराज झाले होते.

वाचा : भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपच्याच सभेत राडा!

दोन गटांमध्ये हाणामारीही झाली 

तसेच काही दिवसांपासून अनिल गोटे आणि सुभाष भामरे यांच्यातील वाद समोर येऊ लागले होते. या वादामध्ये गोटे एकटे पडताना दिसत होते. गेल्या आठवड्यात धुळ्यात भाजपच्या एका कार्यक्रमात स्टेजवरच दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यांनंतर गोटे यांनी सोशल मीडियावर एक पत्र टाकले होते. या पत्रामध्ये त्यांनी भाजपच्या नेतेमंडळींवर जोरदार टीका केली होती. त्यात धुळ्याचे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे देखील नाव होते. त्यानंतर या दोघांमधील वाद उफाळून आले. यावर आता मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आहे.

First Published on: November 18, 2018 7:34 PM
Exit mobile version