महाराष्ट्रात बर्ड फ्लू आलाय, पशुसंवर्धन मंत्री म्हणतात ‘हे’ करा

महाराष्ट्रात बर्ड फ्लू आलाय, पशुसंवर्धन मंत्री म्हणतात ‘हे’ करा

महाराष्ट्रात बर्ड फ्लू आलाय, पशुसंवर्धन मंत्री म्हणतात 'हे' करा

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. याबाबत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी जनतेशी संवाद साधला. बर्ड फ्लूवर आम्ही योग्य मॉनिटरिंग करू त्याचप्रमाणे माणसांना बर्ड फ्लूचा काही धोका होऊ नये यासाठी अंडी किंवा चिकन ७० डिग्री तापमानावर शिजवून खा असे ते म्हणाले. चिकन, अंडी अर्धा तास शिजवल्याने त्यातील विषारी जिवाणू मरून जातील हे विज्ञानातून सिद्ध झाले आहे. हे सगळ्यांच्या भल्याचे आहे असेही ते म्हणाले. बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षी, कोंबड्या मेल्या आहेत. पोल्ट्रिन व्यवसाय धोक्यात आले आहेत. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील काळात काय काळजी घ्यायला हवी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगतिले.

महाराष्ट्राने २००६मध्ये बर्ड फ्लूचा सामना केला आहे. त्यावेळीही राज्याने केंद्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता पशु व्यवसायाला मदतीचा हात दिला होता. यावेळीही राज्याची तशीच भूमिका असणार आहे. त्याचे मुख्य आदेश आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी होणाऱ्या बैठकीत दिले जाणार आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या पशु व्यवसायाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन पशुमंत्र्यांनी दिले आहे. पोल्ट्रि व्यवसायाच्या बर्ड इन्शुरन्स योजना राबविण्यासाठी केंद्र सरकार लक्ष देत नाहीय. अशाप्रकारच्या आपत्तीमध्ये पशुव्यवसायिकांना यामुळे मदतीचा हात मिळेल. केंद्र सरकारने अशा प्रकारच्या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार लोकांना अर्ध्यावर सोडणार नाही. मागच्या काही महिन्यात महाविकास आघाडीच्या सरकारने कोणतेही सेक्टर बेवारस सोडले नाही. आमची तिच भूमिका आजही आहे. २००६ साली आलेला बर्ड फ्लू आणि २०२१ मध्ये आलेला बर्ड फ्लू यात खूप फरक आहे. मागच्या वेळीस कोरोना नव्हता. यावेळी मात्र कोरोनाचे संकट आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. या आधी कोरोनामुळे पशु व्यवसाय धोक्यात आला होता. या व्यवसायाचे मोठे नुकसानही झाले होते. यावेळी बर्ड फ्लू बाबात कोणत्याही अफवा पसरवू नये. अफवा पसरवण्यात येत आहे असे लक्षात येताच कडक कारवाई केली जाईल, असे पशु मंत्र्यांनी सांगतिले. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या दगावल्याचे आढळून आले आहे. त्या विभागातून कोंबड्या बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या गावातील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना बाहेर जाता येईल.


हेही वाचा – परभणीत ‘बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्याचा मृत्यू; बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत

 

 

 

 

First Published on: January 11, 2021 10:50 AM
Exit mobile version