‘अंकुर’ फिल्म फेस्टीव्हलच्या आयोजनाची तयारी सुरू

‘अंकुर’ फिल्म फेस्टीव्हलच्या आयोजनाची तयारी सुरू

'अंकुर' फिल्म फेस्टीव्हल

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिव्यक्ती, मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्या ७ व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टीव्हलच्या आयोजनाची तयारी आता सुरु झाली असून यंदाही नाशिककरांना चित्रपटांची मोठी मेजवानी मिळणार असून सोबत कार्यशाळा आणि मान्यवरांशी संवाद साधता येणार आहे. येत्या २० ते २३ डिसेंबरदरम्यान कुसुमाग्रज स्मारकात हा फेस्टीव्हल संपन्न होणार आहे.

१०० चित्रपट दाखवले जाणार 

अंकुर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नेहमीच प्रस्थापितांबरोबरच नवोदितांना आपली सृजनशीलता, कल्पकता लोकांसमोर मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळत आले आहे. सोबतच समाजातील अनेक समस्या, प्रश्न, बदल यावर दृक्श्राव्य माध्यमातून फेस्टीव्हलमध्ये चर्चा घडवून आणली जाते. अनेकजण आपली मते रोखठोकपणे मांडून समाजाशी थेट संवाद साधतात. हीच परंपरा पुढे नेत यंदाही सुमारे १०० फिल्मस् दाखवल्या जाणार आहेत. यात माहितीपट, कम्युनिटी व्हिडिओ, अॅनिमेशनपट, शार्ट फिल्म यांचा समावेश आहे. सोबतच फिल्म्स डिव्हिजन, मुंबईच्या निवड फिल्मसचे सादरीकरण केले जाणार आहे.

योगदान देण्याचे संस्थांना आवाहन 

या फेस्टीव्हला कायमच संस्था आणि व्यक्तींनी मदत करत त्यांचे योगदान केले आहे. यंदाही सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत इच्छूकांनी आर्थिक आणि त्यासोबतच भेटवस्तू, प्रवास, भोजन, निवास, सजावट, आदीसाठी मदत करावी, असे आवाहन अभिव्यक्तीकडून करण्यात आले आहे.

First Published on: December 3, 2018 7:23 PM
Exit mobile version