मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; 5 तस्करांना अटक, 40 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; 5 तस्करांना अटक, 40 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

वरळी, घाटकोपर आणि वांद्रे येथील अंमली पदार्थ विरोधी सेलने ३ ठिकाणांहून ५ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. 40 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र: मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वरळी, घाटकोपर आणि वांद्रे येथील अंमली पदार्थ विरोधी सेलने ३ ठिकाणांहून ५ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाची ही मोठी कारवाई आहे. या छाप्यात पथकाकडून 40 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गोरेगाव आणि माहीम परिसरात छापे टाकून अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई पोलिस आता या प्रकरणचा अधिक तपास करणार आहेत. ( Anti Narcotics Cell of Worli Ghatkopar and Bandra units arrested 5 drug peddlers from 3 places MD drugs worth rs 40 lakh recovered )

( हेही वाचा: भुवन आश्रमशाळा बलात्कारप्रकरण; आरोपीसह घटना लपविणार्‍यांवर कारवाई करा, नीलम गोर्‍हे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी )

First Published on: April 29, 2023 10:16 AM
Exit mobile version