महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक APMC मार्केटचा कडकडीत बंद!

महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक APMC मार्केटचा कडकडीत बंद!

प्रातिनिधीक फोटो

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात सातत्याने वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व APMC मार्केट बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता केंद्र सरकारने सूट देऊनही महाराष्ट्र सरकारने एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवर लावलेल्या सेसविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी म्हणजेच APMC मार्केट कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले.

बाजार बंद ठेऊन केला निषेध

यामध्ये राज्यातील बऱ्याच APMC चा समावेश आहे त्यापैकी मुंबईतील सर्व एपीएमसी मार्केट, नवी मुंबई, पुणे, बारामती, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मनमाड, सातारा, नीरा, फलटण, लातूर, बार्शी, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार, नांदेड, अहमदनगर या सर्व मार्केटने १०० टक्के बाजार बंद ठेवत सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार व्यापाऱ्यांना APMC वस्तूंच्या व्यवहारातील बाजारपेठ शुल्कातून सूट देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप अजूनही व्यापाऱ्यांवर १ टक्के सेस आकारणे सुरुच ठेवले आहे. याचविरोधात व्यापाऱ्यांनी बंदचा मार्ग निवडला होता.

राज्य शासनाकडे कायम पाठ पुरावा करुनही एपीएमसीमधील कृषी उत्पन्नावर लावण्यात आलेल्या एक टक्का बाजार शुल्क रद्द करण्यात आलेला नाही. तो सरकारने तात्काळ रद्द करावा. यासह एपीएमसीच्या बाहेर होणाऱ्या खरेदीवरील सेस हटवला आहे. त्यामुळे एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना लावण्यात येणारा सेसही रद्द करावा, अशी मागणी व्यापारी करत आहे.

…म्हणून व्यापाऱ्यांनी बंदचा मार्ग निवडला

केंद्र सरकारच्या नव्या धोरणापासून एपीएमसीमधील सेस हटवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्याविरोधातच व्यापाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारला होता.

राज्यभरातून मिळाला चांगला प्रतिसाद

वारंवार मागणी करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर व्यापाऱ्यांनी राज्यस्तरीय बंद पुकारला. याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सर्व एपीएमसी मार्केट मंगळवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.


देशात ‘या’ नागरिकांमुळे कोरोनाचा होतोय फैलाव – ICMR

First Published on: August 26, 2020 9:00 AM
Exit mobile version