Coronavirus: मशिदी बंद करा; सीरत कमिटीचं आवाहन

Coronavirus: मशिदी बंद करा; सीरत कमिटीचं आवाहन

Coronavirus: मशिदी बंद करा; सीरत कमिटीचं आवाहन

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, आता पुण्यतील सीरत कमीटीने मशिदी बंद करण्याचे आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी शुक्रवारचा नमाझ घरीच पठण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील देऊळे बंद करण्यात आली आहेत. यासह पर्यटन स्थळे देखील बंद करण्यात आली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


हेही वाचा – माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो… कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं ?


राज्यात आतापर्यंत करोनाचे ४९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या १२ तासांमध्ये करोनाचे ७ रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १२ देशांना बंदी घालण्यात आली आहे.

 

First Published on: March 19, 2020 4:06 PM
Exit mobile version