दिलासादायक! आता आरसी ऑनलाइन ट्रान्सफर होणार, आरटीओच्या फेऱ्यांचा त्रास वाचणार

दिलासादायक! आता आरसी ऑनलाइन ट्रान्सफर होणार, आरटीओच्या फेऱ्यांचा त्रास वाचणार

वाहन चालवताना चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागतो. तसेच, वाहन चालवताना संबंधित वाहनाचे कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे. मात्र, कागदपत्र अपूर्ण असल्यास वाहनाच्या चालक आणि मालकांना आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागतात. परंतु, आता चालकांना आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) आधार पडताळणीद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि मालकी हस्तांतरण यासारख्या 58 सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत.

‘अशी’ मिळवा आरसी

ज्या ऑनलाइन सेवांसाठी नागरिक आधार पडताळणी करू शकतात त्यामध्ये शिकाऊ परवाना, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण यासारख्या सेवांचा समावेश असेल, ज्यामध्ये ड्रायव्हिंग दाखवणे आवश्यक नाही.

मंत्रालयाने यासंदर्भात 16 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. ज्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नाही तो इतर कोणताही ओळखीचा पुरावा दाखवून या सेवांचा लाभ घेऊ शकतो.

रस्त्यावर वाहन चालवताना तुम्हाला वाहतुकीचे नियम पाळावे लागतात. तसेच, काही महत्त्वाची कागदपत्रेही तुमच्यासोबत असणे आवश्यक असते. या दस्तऐवजांमध्ये वाहन चालविण्याचा परवाना ते नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि विमा यासारख्या कागदपत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी आरटीओच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात.


हेही वाचा – हैदराबादशिवाय भारत अपूर्ण, स्वातंत्र्य युद्धात आरएसएस-भाजप नव्हते; ओवैसींचा शाहांवर पलटवार

First Published on: September 19, 2022 4:03 PM
Exit mobile version