वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सज्जता; ४६ रुग्णालयात एक हजार बेड्सची व्यवस्था

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सज्जता; ४६ रुग्णालयात एक हजार बेड्सची व्यवस्था

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिका रुग्णालयात मास्क सक्ती लागू केली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील खासगी रुग्णालयातही मास्कची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, ४६ खासगी रुग्णालयात तब्बल एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील रुग्णालयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आणि खासगी रुग्णालयांनी जय्यत तयारी केली आहे.

मुंबईत महापालिका रुग्णालयांत सर्व कर्मचारी, रूग्ण, अभ्यागत यांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मास्क वापरावेत, असे आवाहनही पालिका आयुक्तांनी केले आहे. मुंबईत खासगी रुग्णालयांची संख्या बऱ्यापैकी आहे. श्रीमंत व्यक्ती, विदेशातून येणारे हवाई प्रवासी त्यांना काही आजारपण असल्यास ते मोठमोठ्या खासगी रुग्णालयातच उपचार करण्यासाठी दाखल होतात. त्यामध्ये कोणी कोरोना बाधित असल्यास त्याचा फटका इतरांना बसू नये, यासाठी खासगी रुग्णालयातही डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेने, सायन, केईएम, नायर आदी प्रमुख रुग्णालये, १७ सर्वसाधारण रुग्णालये या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेड्स, औषधे, ऑक्सिजन आदींची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे, ४६ खासगी रुग्णालयातही एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.


हेही वाचा : अजूनही ‘त्या’ प्रवाशांची हिमालयाखालूनच जीवघेणी पायपीट, प्रशासनाने दखल घेण्याची गरज


 

First Published on: April 11, 2023 9:34 PM
Exit mobile version