कर्नाटकच्या घटनेवरून पीएम मोदी गप्प का?, अरविंद सावंतांचा सवाल

कर्नाटकच्या घटनेवरून पीएम मोदी गप्प का?, अरविंद सावंतांचा सवाल

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये झालेल्या घटनेवरून अरविंद सावंत यांनी मागणी केली आहे. तसेच कर्नाटकच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?, असा सवाल सावंतांनी विचारला आहे. लोकसभेमध्ये अरविंद सावंत पीएम मोदींनी याबाबत प्रश्न देखील विचारणार आहेत.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे निव्वळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही. तर ते उभ्या देशाचं आराध्य आहे. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला आणि स्वराज्य, सुराज्य निर्माण केलं. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटक राज्यामध्ये करण्यात आली आहे. ही विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई वसवराज या घटनेला शुल्लक असं म्हटलं आहे. ही अत्यंत क्लेशदायक आणि संतापाची गोष्ट आहे.असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

बोम्मई यांना जनाची नाही, मनाची…

छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाल्यानंतर आमच्याच मराठी बांधवांना अटक करण्यात आली आहे. एवढचं नव्हे तर त्यांच्यावर ३०७ कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे संसद जर योग्य प्रमाणे सुरू असेल किंवा चालली. तर निश्चितपणे हा प्रश्न मी सभागृहात मांडणार आहे. देशाच्या आराध्य दैवताचा अवमान करणाऱ्या कर्नाटक सरकारची निर्वसना मी करणार आहे. बोम्मई यांना जनाची नाही, मनाची असेल. अशी टीका सावंतांनी केली आहे.

पीएम मोदी गप्प का आहात?

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काल काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा औरंगजेबासारखे हल्ले होत होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले आणि त्यांनी त्याला प्रतिहल्ला केला. त्याच छत्रपतींचा अवमान तुमचेच सरकार आणि मुख्यमंत्र्यांसह तुमचीच मंडळी करतात. त्यावर तुम्ही गप्प का आहात. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.

बोम्मईंचा निषेध करणार

बोम्मईंचा मी निषेध करणार असून केंद्र सरकारने सुद्धा कारवाई केली पाहीजे. परंतु पीएम मोदी गप्प का, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी त्यांचे कान का नाही ओढले. खरंतर त्यांनी राजीनामा मागितला पाहीजे. अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारने याबाबत दखल घ्यावी, असं अरविंद सावंत म्हणाले.


हेही वाचा : Delhi Air Pollution : दिल्लीत वाढत्या प्रदूषणाचा कहर, कोणत्या राज्यात काय स्थिती


 

First Published on: December 20, 2021 11:44 AM
Exit mobile version