मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे.

विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे. तसेच, मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे.

पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा पुढील कार्यक्रम


हेही वाचा – श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्रपती भवनात धुडगूस, गोतबायांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

First Published on: July 10, 2022 6:47 AM
Exit mobile version