सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत, आशिष शेलारांचा आरोप

सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत, आशिष शेलारांचा आरोप

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु राज्या गेल्या काही दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेला नाही, असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. मात्र, याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत आहे. या भारनियमनावर सर्व आदळआपट केंद्राच्या नावाने सुरू आहे, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत

आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी वीजप्रश्नावर पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते. सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत आहे. या भारनियमनावर सर्व आदळ-आपट केंद्राच्या नावाने सुरू आहे. भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली, आमचा थेट आरोप आहे. देखभाल दुरुस्ती उन्हाळ्याआधी करता येते. मात्र, ती करण्यात आली नाही, असं आशिष शेलार म्हणाले.

सरकारी खात्यात हजारो कोटींची थकबाकी

सरकार टंचाई निर्माण करत आहे. यामध्ये टंचाई निर्माण करायची आणि खासगी कंपन्यांनाकडून वीज घ्यायची. देखभाल दुरुस्तीसाठी वीज बंद केली. त्यामध्ये २७ केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सरकारी खात्यात हजारो कोटींची थकबाकी आणि सामन्याकडून थकले की वीज कट करायची हा कुठला कारभार, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

सरकारी खात्याने वीजबिले भरली नसतील तर संबंधित खात्यातील वीज किती वेळ बंद ठेवणार, असे विचारत जाणूनबुजून हे सर्व होत असल्याचे ते म्हणाले. आता याचप्रकरणी उद्यापासून राज्यभरात टप्याटप्याने आंदोलन होणार आहे. अजान, भोंगे, हनुमान चालीसा या सगळ्यांना वीज लागणार आहे. बाकीच्यांना यावर लक्ष द्यायला वेळ नाही पण भाजपा यावर लक्ष ठेवून असल्याचे शेलार यांनी सांगितले.

अनधिकृत भोंग्यावर कारवाई झालीच पाहिजे. जर सरकारने अनधिकृत भोंग्याना अधिकृत करण्याचा प्रयत्न केला तर जशास तशे उत्तर देऊ, हनुमान चालीसा कार्यक्रम झाले तर त्याचे स्वागतच आहे, असं शेलार म्हणाले.


हेही वाचा : बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊदे – खासदार संजय राऊत


 

First Published on: April 22, 2022 12:56 PM
Exit mobile version