जलयुक्त शिवार योजनेवर आरोप म्हणजे राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

जलयुक्त शिवार योजनेवर आरोप म्हणजे राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

डिस्को, बार, पब आरोग्य केंद्रे आहेत का?, मंदिर उघडण्याच्या प्रश्नांवरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

जलयुक्त शिवार योजनेवर महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रयुत्तर दिलं आहे. राज्य सरकारवर आशिष शेलार यांनी निशाणा साधत हा बदनामीचा खेळ तुमच्यावरच उलटेल असा इशारा दिला आहे. तसेच जलयुक्त शिवाराच्या कामात चुका आणि अनियमितता बघणे हे महाराष्ट्राची बदनामी करण्यासारखे आहे. या बदनामीच्या खेळात राज्य सरकार केवळ राजकीय स्वर्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत आहे. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे की जलयुक्त शिवारच्या कामामध्ये अनियमितता बघणे म्हणजे हा केवळ बदनामीचा दुसरा खेळ ठाकरे सरकारने केला आहे. या बदनामीच्या खेळात राज्य सरकार केवळ राजकीय स्वर्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत आहे. जलयुक्त शिवाराची कामे जिल्हाधिकारी स्तरावर ठरली, लघुपाठबंधारे, जलसंधारण मंत्रालय, वनखाते अशा ७ वेगवेगळ्या खात्यातून मंजुरी मिळाली. देयक देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याचा होता मंत्रालयात केवळ धोरण ठरले होते त्यामुळे यातून कोणा एका व्यक्तीला आणि योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने करु नये ते त्यामध्ये सफल होणार नाहीत.

ज्या पद्धतीचे आरोप समोर येत आहेत त्यामध्ये साडे सहा लाखांच्यावर काम झाली आहेत. त्यापैकी, ६५० कामांची चौकशी ही फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आली आहे. १ टक्के कामांची चौकशीच्या आधारावर संपुर्ण योजनेला बदनाम करणं हा खेळ महाराष्ट्राच्या हिताचा नाही. ज्यापद्धतीने मराठवाड्याच्या पाण्याची पातळी वाढली. ४ वर्षे राज्यात फडणवीस सरकारमध्ये दुष्काळ होता तरीही शेतीची उत्पादकता आणि पाण्याच्या पातळी वाढली हे उच्च न्यायालयाच्या समितीने म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या आणि श्रमदान सुद्धा दिले ही योजना उपयोगाची होती म्हणूनच केले यामुळे हा बदनामीचा आरोप शेतकरी विरोधी दिसतो महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने करु नये असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ज्या पद्धतीने बिलं आणि बिलावरचा आरोप केला गेला तर साधं सरळ गोष्ट या सरकारला माहिती नसेल तर आश्चर्य आहे. यामध्ये ३ लाखांच्या वरची कामे टेंडरने निघतात मात्र ३ लाखांच्या खालची कामे जिल्हास्तरावर निघाली त्यातून सीएसआर फंडातून जी कामे निघाली ती कामे सीएसआरमधल्या त्या एनजीओसने स्वतः केली. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी जे राज्याच्या हिताचे आणि पाण्याची पातळी वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हिताचे होते ते बदनाम करण्याचे काम ठाकरे सरकारने करु नये. हा खेळ सरकारवरच उलटेल हे असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबईतील रुग्णालयांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्यास केंद्र सरकारवर गुन्हा दाखल करावा असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर आशिष शेलार यांनी मुंबईतील रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा लागेल असे म्हटलं आहे. मुंबईत अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे मुंबईतील रुग्णालयावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल असा निशाणा आशिष शेलार यांनी साधला आहे. तर मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात मृतदेहांसाठी लागणारे किटमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत मुंबई महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आशी मागणी केली आहे.

First Published on: July 21, 2021 7:32 PM
Exit mobile version