राजकीय फायद्यासाठी सरकारने भीमा कोरेगाव घडवून आणलं – अशोक चव्हाण

राजकीय फायद्यासाठी सरकारने भीमा कोरेगाव घडवून आणलं – अशोक चव्हाण

राजकीय फायद्यासाठी सरकारने भीमा कोरेगाव घडवून आणलं - अशोक चव्हाण

‘भाजपने जुमलेबाजी केली. देशातल्या मतदारांच्या मनात सत्ताधारींच्याप्रती आक्रोश निर्माण झाला आहे. जातीजातीत भांडण लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. राजकीय फायद्यासाठी भीमा कोरेगाव या सत्त्याधाऱ्यांनी घडवून आणले’, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज शनिवारी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळ येथे आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. मात्र, या परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विखे पाटील अनुपस्थितीत आहेत.

मतांचे विभाजन टाळून सर्व पक्षांनी एकत्र यावं – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण म्हणाले की, ‘आमचा प्रयत्न होता की, आणखी काही पक्षांनी महाआघाडीचत सामील व्हावे. पण भाजपने साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करुन काही पक्षांना आपल्या बाजूने घेतले. भाजप आणि त्या पक्षांना जनता माफ करणार नाही. मागच्या पाच वर्षात राज्य-देशात जुमलेबाजी सुरु आहे. मतांचे विभाजन टाळून सर्वांनी एकत्र यायला हवे. जनतेचा कॉल लक्षात घेऊन आम्ही महाआघाडी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सरकारने केले. भीमा कोरेगावसारखी दंगल घडवून आणली. संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांना मोकळे सोडण्याचे काम केले. उद्योगधंदे मोडीत काढून बेरोजगारांची फौज उभी करण्याचे काम या सरकारने केले आहे. ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ या सरकारने केले आहे. कर्जमाफीचा या सरकारने केलेला खेळ शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला आहे. सत्तेत आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ, अशी आश्वासन दिलेले होते. परंतु, अजूनही लागू झालेले नाही. गाजर दाखण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारने जाणूनबूजून मुस्लीम समाजाला आरक्षण दिलेले नाही. दलित आदिवासी समाजाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळू नये, असे या सरकारने धोरण केले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.’

जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू – जयंत पाटील

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, ‘ या देशातली लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र आले पाहीजे. या विचारातून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. अनेकांशी चर्चा करुन यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारीचे प्रश्न, ग्रामीण भागातील जनता दुष्काळात होरपळत आहे. यांना न्याय देण्याचे काम करु. देशाचे पंतप्रधान हे गुपचूप पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश देतात आणि दुसर्‍या बाजूला देशातील नागरिकांना वेगळेच सांगतात. मोदी सार्वजनिक जीवनात आणि खासगी जीवनात वेगळेच वागतात. सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव मिळावा आणि शेतकरीचे जीवन सुकर व्हावे, असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू.’

किटकनाशके फवारुन कमळाला नष्ट केले पाहीजे – राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले की, ‘भाजपने सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार यांचा सर्वांचाच विश्वासघात गेला. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले आणि लुच्चे लोकांचे सरकार आम्हाला मिळाले. सामाजिक आणि धार्मिक ऐक्य सुद्धा धोक्यात आणले आहे. संताचा आणि समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र जाती जातीत, धर्मात तिरस्कार निर्माण करुन राजकारण करण्याचा हिडीस प्रयत्न या सरकारने केला. सामाजिक ऐक्य धोक्यात आले असताना संविधान बदलू, अशा प्रकारच्या वल्गना केल्या. लोकशाही टिकवणाऱ्या सुप्रीम कोर्ट, सीबीआय अशा संस्था धोक्यात आल्या. माझ्या सारख्या शेतकर्‍याला वाटतंय की किटकनाशक फवारुन हे कमळाचे पिक आता नष्ट केले पाहीजे.’

महाआघाडीत आले नाहीत ते भाजपची बी टीम आहे – अजित पवार

यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘वेळ पडली तर १० जागा मित्र पक्षांना द्यायच्या. ३८ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने लढायचा, असा निर्णय घेतला होता. काहींना आम्ही ६ जागा द्यायला तयार होतो. मात्र त्यांनी शेवटच्या दिवसांपर्यंत अनेक कारणे देत महाआघाडीत येण्याचे टाळले. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की, जे महाआघाडीत आले नाहीत ते भाजपची बी टीम आहे. ज्यावेळेस सेना-भाजपचे सर्व उमेदवार जाहीर होतील तेव्हा यादी पाहा. त्यात २५ टक्के उमेदवार हे काँग्रेस – राष्ट्रवादीमधील आहेत. चौकशीचा ससेमारा लावून सत्तेचा गैरवापर करुन तोडाफोडाची निती वापरण्याचे काम भाजपने केले आहे.’

First Published on: March 23, 2019 4:43 PM
Exit mobile version