Maharashtra Assembly Winter Session: शेतकरी, ST कर्मचारी, कायदा सुव्यवस्थांच्या प्रश्नावरुन सरकारचा पर्दाफाश करणार, प्रवीण दरेकरांचा इशारा

Maharashtra Assembly Winter Session: शेतकरी, ST कर्मचारी, कायदा सुव्यवस्थांच्या प्रश्नावरुन सरकारचा पर्दाफाश करणार, प्रवीण दरेकरांचा इशारा

भाजप नेत्यांवर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन षडयंत्र रचलं जातंय, प्रवीण दरेकरांचा आरोप

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनात राज्य सरकारचे राज्यातील अनेक प्रश्नांवरुन राज्य सरकारला धारेवर धरणार आहेत. राज्यातील प्रश्नांवरुन राज्य सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचा इशाराच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेसह विरोधी पक्षातील नेत्यांनाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दर्शन झाले आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळ भवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचे विकासकाम महाविकास आघाडी सरकार करत नाही. उलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरु केलेली कामे रोखण्याचे काम पक्षीय अभिनिवेशाने सुरु झाली आहेत. जी काही कामे सुरु आहेत ती रोखीने सुरु आहेत. त्यामध्ये दलालांचे आर्थिक हीत आहे. त्यामुळे शेतकरी, एसटी कर्मचारी, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार यांच्या प्रश्नावरुन सरकारचा पर्दाफाश करणार आहेत असे दरेकर म्हणाले.

गेल्या दीड ते दोन महिन्यापासून राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांचे दर्शन झाले नाही. आम्हालासुद्धा झाले नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले असताना जर मुख्यमंत्री दिसत नाही तर न्याय कोणाकडे मागणार कारण शेवटी महत्त्वाचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेत असतात परंतु आज मुख्यमंत्री कुठे आहेत ? सरकार हारवलय का अशा प्रकारचे चित्र दिसत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या – चंद्रकांत पाटील


 

First Published on: December 22, 2021 11:09 AM
Exit mobile version