घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly winter session 2021: आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या - चंद्रकांत...

Maharashtra Assembly winter session 2021: आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या – चंद्रकांत पाटील

Subscribe

मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणं स्वाभाविक आहे. आमचा आग्रह एवढाच आहे आणि नियम असा आहे की, तुम्ही कोणालातरी चार्ज द्यावा लागतो. त्याची सुद्धा एक मोठी प्रक्रिया आहे. तो चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. कारण राज्यपालांशिवाय काहीही करता येत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य दोन पक्षांचा अविश्वास हा स्वभाविकच आहे. कारण त्यांनी चार्ज घेतला तर ते सोडणारचं नाहीत. पण त्यांच्या पक्षावरही त्यांचा विश्वास नसेल तर त्यांनी चार्ज आदित्य ठाकरेंना द्यायला पाहीजे. ठाकरेंना त्यांच्या मुलावर विश्वास नसेल. त्यामुळे ते चार्ज देणार नाहीत. असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

पेपर फुटी प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणीवरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, विधीमंडळाबाहेरील पत्रकारांशी संवाद साधतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचे पोलीस किती सक्षम आहे ते दिसलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा असून जर मंत्रालयात त्याची चर्चा होते. त्यामध्ये एका मंत्र्याचं नाव अस्पष्ट पुढे आलं आहे. त्यामुळे पोलीस त्यांची चौकशी कशी करणार?, त्यामुळे आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती राजवट लागू होणार?

राष्ट्रपती राजवट येणं हे काही स्वप्न असू शकत नाही. ती येण्यासाठी सर्व कारणं घडलेली आहे. त्यामुळे कधी राष्ट्रपती राजवट लागू करायची हा केंद्राचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट चुकीची असली आणि जर ती प्रत्यक्षात साकार होत नसेल तर ती गोष्ट स्वप्नात बघायची असते. ही व्यवहारातच आली पाहीजे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मोदीचं मुखदर्शन जरी झालं नसलं आणि संसदेत जरी आले नसले. तरी ते सगळ्या बाजूंनी अॅक्टिव्ह आहेत. राज्यशासन हे मुख्यमंत्र्यांविना चालणार नाही. असं देखील पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: शक्ती कायदा याच अधिवेशनात येणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -