‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर हल्ला

‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर हल्ला

मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे

लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पुण्यातील पौड रस्त्यावरील कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शीत होत असून नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र चित्रपटात दाखवलेली गुंडगिरी जणू आपल्याच आयुष्यावर आधारीत व्यक्तीरेखा असल्याचे समजून प्रवीण तरडेंना मारहाण झाल्याचे समजते. तसेच त्यांच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत प्रवीण तरडे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रीया दिली असून म्हटले आहे की, ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारीत नसून एक काल्पनिक कथेवर बेतलेला आहे.

वाचा : मुळशी पॅटर्नचा ट्रेलर रिलीज

काय म्हणाले प्रवीण तरडे 

१९०-९१ साली शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटांमुळे त्यांची मुलं कशी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात, याबाबतचे कथानक मुळशी पॅटर्नमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र एका इसकाच्या माणसांनी आज, १८ नोव्हेंबर रोजी माझ्या कार्यालयात येऊन बाचाबाची सुरु केली. आमच्याच झटापटही झाली. परंतू त्यांच्या बहिणीला मी चित्रपट दाखवला आणि त्यांचा गैरसमज दूर झाला. पंरतू तरुणांचा उत्साह जास्तच असतो. या उत्साहाच्या भरात त्यांनी काहीही न ऐकता वाद घालण्यास सुरुवात केली. ही घटना घडली त्यावेळी माझी पत्नीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होती. ती स्वतः पोलीस दलात असून मुख्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे या घटनेबाबत काय करायचे हे पत्नी ठरवेल. मुळशी तालुक्याला असलेला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा कलंक मला पुसून काढायचा आहे. कारण मी स्वतः मूळचा या तालुक्याचा रहिवासी आहे. त्यामुळे मीच या लोकांची तक्रार केली, तर ते योग्य होणार नाही. मात्र माझ लोकांना इतकच सांगण आहे की, हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमचे सगळे गैरसमज नक्की दूर होतील.

वाचा : ‘मुळशी पॅटर्न’चा खतरररररनाक ट्रेलर!

२३ नोव्हेंबरला होत आहे प्रदर्शीत

एका तालुक्याची नाही तर अख्ख्या देशाची गोष्ट ही टॅग लाईन घेऊन ‘मुळशी पॅटर्न’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या मराठी चित्रपटाचे पटकथा, लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, स्वतः प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटाचे कथानक असून येत्या २३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ च्या ट्रेलरमुळे चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

First Published on: November 18, 2018 5:41 PM
Exit mobile version