उद्धव ठाकरेंमुळेच निवडून आलात; अब्दुल सत्तारांना चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंमुळेच निवडून आलात; अब्दुल सत्तारांना चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे 24 मिनिटांत नुकसानीची कशी पाहणी करणार अशी टीका सत्तार यांनी केली. अब्दुल सत्तार यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (aurangabad chandrakant khaire criticizes abdul sattar over uddhav thackeray visit to aurangabad)

“राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी किती ठिकाणी पाहणी केली याचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी आधी द्यावे. राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत. सत्तार म्हणतात मी 69 ठिकणी जाऊन आलो, पण जाऊन काय करून आलेत. तिथे जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असे सांगतायत. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच निवडून आले आहेत हे सत्तार यांनी विसरू नयेत” अशी टीका चंद्रकात खैरे यांनी केली.

याशिवाय, “निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सत्तार माझे आणि उद्धव ठाकरे यांचे पाया पडायचे. मला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणा म्हणत पाय धरायचे. आता सत्तार यांना मस्ती आहे. त्यांना या पक्षातून त्या पक्षात फिरण्याची सवय आहे. कोणत्या पक्षात जातील माहित नाही. त्यामुळे आता त्यांचा आम्ही बंदोबस्त करतो”, असेही खैरे म्हणाले.


हेही वाचा – आग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू, ४१ जण जखमी

First Published on: October 23, 2022 2:03 PM
Exit mobile version