Coronavirus : चिंता कायम! औरंगाबादमध्ये दिवसभरात २३० कोरोनाबाधित रुग्ण!

Coronavirus : चिंता कायम! औरंगाबादमध्ये दिवसभरात २३० कोरोनाबाधित रुग्ण!

दिवसेंदिवस वाढत जाण्याऱ्या कोरोना रूग्णांमुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये काल एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.

तर औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांचा आचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे आस्तिक कुमार, त्यांच्या पत्नी औरंगाबाद ग्रामीणच्या एसपी मोक्षदा पाटीलही होम क्वॉरन्टाईन झाल्या आहेत. त्यांच्यासोबतच आणखी ३६ जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात ३ हजार ८९० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ३९ हजारांच्या पार गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल ४ हजार १६१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६९ हजार ६३१ आहे. राज्यात काल २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हे ही वाचा – अबब! सोन्याची किंमत रचणार इतिहास, दिवाळीत गाठणार उच्चांक!


 

First Published on: June 25, 2020 9:53 AM
Exit mobile version