कोरोनाची रूग्ण वाढ कायम, औरंगाबादमध्ये २४ तासात १९३ नवे रूग्ण!

कोरोनाची रूग्ण वाढ कायम, औरंगाबादमध्ये २४ तासात १९३ नवे रूग्ण!

पुण्याचा धोका वाढतोय; २४ तासांत आढळले २,६०१ रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

कोरोनाचा प्रार्दुभाव औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज धक्कादायक आकडे समोर येत आहेत. आज औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये १०९ पुरुष आणि ८४ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ४९२वर पोहोचला असून २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर औरंगाबादमध्ये वाळूज भागातील बजाज कंपनीत ७९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बजाजकडून दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात काल विक्रमी ४ हजार ८४१ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता १ लाख ४७ हजार ७४१ अशी झाली आहे. काल ३ हजार ६६१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या ६३ हजार ३४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात १९२ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.


हे ही वाचा – Coronavirus: बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!


 

First Published on: June 26, 2020 11:04 AM
Exit mobile version