औरंगजेबाचे पोस्टर्स हा काही योगायोग नाही, हा प्रयोग आहे; फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

औरंगजेबाचे पोस्टर्स हा काही योगायोग नाही, हा प्रयोग आहे; फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि उफाळलेल्या दंगली यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलेच शरसंधान साधले.

सुरुवातीला त्यांनी दंगलीची संख्या कमी झाली आहे असे सांगत, मात्र मागील काही घटनांवरुन औरंगजेबाच्या मिरवणुकी, पोस्टर्स, स्टेटस आणि एकाच वेळी अनेक जिल्ह्यामध्ये हा काही योगायोग नाही तर हा प्रयोग आहे असे म्हणत राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, भारतीय मुस्लिमांचा हिरो कधीही औरंगजेब नव्हता आणि तो होऊही शकत नाही, आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला तो मुस्लिमांचा हिरो होऊच शकत नाही. तर औरंगजेब हा टर्कीक मंगोल होता. येथील मुस्लिम त्याचे वंशजसुद्धा नाहीत. तो कधीच इथला हिरो होऊ शकत नाही. मात्र याच्या पाठीमागे एक डिझाईन आहे. याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतल्या जात आहे. काहींना अटकसुद्धा करण्यात आली असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी धर्माच्या आधारे, जातीच्या कधीच आम्ही भेदाभेद करणार नसल्याचे सांगितले. मात्र याच वेळी त्यांनी औरंगजेबाचे कुणी उद्दातीकरण कर असेल तर त्याला सोडणार देखील नाही असे म्हणत दंगलखोरांना चांगलाच दम भरला.

हैवानियततेचा कळस म्हणजे मीरा रोडची घटना

यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील विद्यार्थिनीवरील हल्लेचा ओझरता उल्लेख करीत फडणवीसांनी मीरा रोडची घटनेबाबत बोलताना म्हटले की, सरस्वती राम वैद्यचे खुन प्रकरण म्हणजे हैवानियत काय असते अशा घटनेतून दिसून येते. असे लोक कुठे पैदा होतात आणि त्यांना कोठून अशी हैवानीयत सुचते देव जाणे म्हणत या प्रकरणातही कारवाई केली असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : बारसू आंदोलनातील लोकांना बंगळुरूतून आर्थिक रसद; फडवीसांचा विधान परिषदेत गौप्यस्फोट

निवडणुका आम्हालाही हव्या आहेत

निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही. निवडणूक आयोगाला अधिकार आहे. निवडणूक आयोगानेच निवडणूक थांबविल्या. 4 ऑगस्ट 2022 रोजीच सार्वत्रिक निडणूक थांबविण्याच आदेश दिले होते. वॉर्डाची केस वेगळी केली आहे. तर आम्हाला निवडणूक हवी आहे, परंतू सर्वोच्च न्यायालयापुढे जाता येत नाही. नाही तर चला सगळे सोबत जाऊ आणि निवडणुका घेण्यास सांगू असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

First Published on: August 4, 2023 1:43 PM
Exit mobile version