घरपावसाळी अधिवेशन 2023बारसू आंदोलनातील लोकांना बंगळुरूतून आर्थिक रसद; फडवीसांचा विधान परिषदेत गौप्यस्फोट

बारसू आंदोलनातील लोकांना बंगळुरूतून आर्थिक रसद; फडवीसांचा विधान परिषदेत गौप्यस्फोट

Subscribe

बारसू आंदोलनातील लोकांना बंगळुरूमधून आर्थिक रसद पुरविली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. विधानपरिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात बोलतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू आंदोलना संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. बारसू आंदोलनातील लोकांना बंगळुरूमधून आर्थिक रसद पुरविली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, बारसूमधील रिफायनरीला विरोध करणाऱ्यांमधील आंदोलक हे तुम्हाला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या आंदोलनात तर काहीजण हे नर्मदेच्या आंदोलनातही दिसून येतात. मी सगळ्यांवरच आरोप करीत नाही तर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी सपोर्टही केला आहे. मात्र, काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको त्यामुळे ते विरोध करीत असतात. मी कुणाचे नाव घेत नाही. आपण जर बारसू आंदोलनातील या लोकांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात असे म्हणत सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडे बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळे हे फक्त गावकऱ्यांपुरते मर्यादित आंदोलन नाही असे म्हणत त्यांनी होऊ घातलेल्या रिफायनरीतून पुढची वीस वर्षे या राज्याची अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतो त्याला विरोध करणं योग्य नाही असे म्हटले. कातळशिल्पाला काहीही होऊ देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : महिला सुरक्षित नाही असे नेरेटिव्ह सेट करू नका; विधान परिषदेत फडणवीसांनी आकडेवारीच मांडली

वारकऱ्यांवर सकारने लाठीचार्ज केला नाही

विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या वारकऱ्यांवरील लाढीचार्ज संबंधात माहिती देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या महाराष्ट्रात कोणतेही सरकार आले तरी ते वारकऱ्यांवर लाठाचार्ज करीत नाही. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. मागच्या वर्षी मंदिरात प्रवेश दिला त्यावेळी महिलांच्या अंगावर महिला पडल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजनावर बैठक झाली. यामध्ये वरिष्ठ पोलीस आधिकारी, आळंदी शहरातील काही प्रतिष्ठीत मंडळी, 56 दिड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्थ यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 56 दिंड्याना प्रत्येकी 75 पास द्यायचे. पहिले त्यांना प्रवेश द्यायचा. ते दर्शन घेऊन मंदिराबाहेर निघाल्यानंतर इतरांना दर्शनासाठी आत सोडायचे हे ठरले होते अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

- Advertisement -

हेही वाचा : “महापुरुषांच्या अवमानावर उपमुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका व्यक्त केली असती…”, अंबादास दानवेंची खंत

फडणवीसांनी घटनाक्रमच सांगितला

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, दर्शन सुरू असताना सुरक्षेसाठी तिथे काही बॅरिकेट लावले होते. बॅरिकेट लावलेल्या ठिकाणी जोग महाराज शिक्षण प्रशालेचे काही आजी माजी विद्यार्थी आले. त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. त्यांना समजवण्यात आले, आत गेलेल्यांच दर्शन होऊ द्या. मग तुम्ही जा असे सांगण्यात आले. पंरतु त्यांनी न ऐकता बॅरिकेट तोडले अक्षरक्षः पोलिसांना तुडवून ते पुढे गेले. यामध्ये काही पोलीस जखमीसुद्धा झाले. पण पुन्हा पोलिसांनी त्यांना थांबवले. मंदिर परिसरातील ही सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. संपुर्ण घटना तपासली असता त्यामध्ये कुणालाही लाठीचार्ज झाला नसल्याचे दिसुन येत आहे. घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज असल्याचंही पुढे फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -