Awhad Vs Ajit Pawar : “सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर वागणारा विरोधी पक्ष नेता म्हणजे अजित पवार”, जितेंद्र आव्हाड यांची टीका

Awhad Vs Ajit Pawar : “सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर वागणारा विरोधी पक्ष नेता म्हणजे अजित पवार”, जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई : सत्ताधाऱ्यांच्या टिपांवर वागणारा विरोधी पक्ष नेता म्हणजे अजित पवार, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सत्ताधारी अडचणीत येणार नाही, याची काळजी विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार घेत होते, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भाषणा करायला माहिती, अभ्यास आणि मांडणी लागते. तुम्ही विरोधी बाकावरून भाषण करायचे. तेव्हा तुम्ही काय भाषणे करायचे, तुमचा पीए तुम्हाला भाषण लिहून द्यायचा. त्यात तुम्ही सत्ताधारी पक्षावरील महत्त्वाची टीका तुम्ही बाजूला करून टाकत होतात. तुम्ही सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतात. तुम्ही विरोधकांचे नेता नव्हतात. सत्ताधाऱ्याच्या टिपांवर वागणारा विरोधी पक्ष नेता म्हणजे अजित पवार. सत्ताधाऱ्यांनी दिलेली टीपही तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि विरोधकांची दिशा बदलून टाकायचे. सत्ताधारी अडचणी येणार नाही, याची काळजी विरोधी पक्ष नेते अजित पवार.”

हेही वाचा – Awhad On Ajit Pawar : सर्वाधिक जातीयवादी नेता म्हणजे अजित पवार; आव्हाडांचा दादांवर थेट हल्ला

…तर जितेंद्र आव्हाडांना पक्षात ठेवलं असतं का?

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही (अजित पवार) पक्षात असताना कुठे- कुठे निघाले होते. त्याच चुका जितेंद्र आव्हाडांनी केल्या असत्या तर पक्षात ठेवले असते का? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. आमच्याबद्द काय खोटेनाटे जाऊन सांगायचे शरद पवारांना हे का आम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त तेवढे काम होते. त्याचा मी पुरावा आहे. हे माझ्याबाबतीतच घडले आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad : “शरद पवारांसमोर तुम्ही सेंटीमीटरही नाही”, आव्हाडांचा अजितदादांना टोला

छगन भुजबळांनी शपथ घेऊन सांगावं…

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छगन भुजबळांनी शपथ घेऊन सांगावं की, ओबीसींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थांबविला होता की नाही तर? आदिवासी मंत्री होते गावीत त्यांनीही सांगावं की, आदिवासींचा निधी थांबविला होता की नाही? एससी, एसएसटी, ओबीसी या तिन्ही समाजाचा निधी थांबविण्याचं काम काय अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या अजित पवारांनी केलेलं आहे. हे काय सांगता आम्हाला असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. जातीयवाद पाळणारा नेता कोणी असेल तर ते अजित पवार आहेत. अशीही टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

 

First Published on: February 16, 2024 4:52 PM
Exit mobile version