घरमहाराष्ट्रAwhad On Ajit Pawar : सर्वाधिक जातीयवादी नेता म्हणजे अजित पवार; आव्हाडांचा...

Awhad On Ajit Pawar : सर्वाधिक जातीयवादी नेता म्हणजे अजित पवार; आव्हाडांचा दादांवर थेट हल्ला

Subscribe

आज 16 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादीच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली आहे. राज्यात दोन अधिवेशन असून, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे.

मुंबई : राज्यातील सर्वात जातीयवादी नेता म्हणजे अजित पवार असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर बात निकलेगी तो दूर तक जायेगी असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे. (Awhad On Ajit Pawar The most communalist leader is Ajit Pawar Direct attack on Dada by Awhad)

आज 16 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादीच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली आहे. राज्यात दोन अधिवेशन असून, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मान्य केलं आहे. त्यांनी याबाबत कोरम ठरवलं असून, दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होऊ शकते. तर अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांनीच का उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षात किती भांडणं लागली होती. हे त्यांनी सांगावं. नाशिकच्या एका आमदाराला, तर रायगडच्या एका खासदाराला पुन्हा एकदा खासदार व्हायचं होतं. अजूनही दोनचार जण मागे लागले होते. याच दरम्यान वंशालासुद्धा खासदार व्हायचं होतं. ही सगळी अडचणी सोडावयची असेल तर मग काय करायचं तर मग प्रफुल्ल पटेल उतरवले मैदानात. पक्षाचा खरा भाई जर कोणी असेल तर ते प्रफुल्ल पटेल आहेत. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा : Supriya Sule : तुम्ही का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी? आबांविषयीचं पत्र शेअर करत सुळे भावूक

अधिकृतरित्या अध्यक्ष होण्यासाठी कोण रोखलं होतं?

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आम्ही जर मोठ्यांच्या पोटी जन्माला आलो असतो तर मला अजित अध्यक्ष होण्यापासून कुणीच रोखलं नसतं, यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्हाला अध्यक्ष होण्यापासून कुणी रोखलं होतं? तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात? पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात? आपण सत्तेसाठी जन्माला आलोय हे खूळ तुमच्या डोक्यात आधीपासूनच होतं. त्यामुळे रस्त्यावरील एखादं आंदोलन केलं आहे का तुम्ही? हे दाखवावं. एखाद्यातरी आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे का? असा प्रश्न विचारतच फक्त सत्ता आणि सत्तेचं राजकारण करायचं आणि तेही शरद पवारांचं नाव वापरुन. आणि तुम्ही रक्ताचे जरी नसले तरी त्यांच्याच रक्तात होता.

- Advertisement -

हेही वाचा : Ravichandran Ashwin : कसोटीत 500 विकेट घेत अश्विनने रचला इतिहास; कुंबळे-वॉर्नला टाकले मागे

1999 पासून 2014 महत्त्वाची खाती तुमच्याकडेच

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1991 साली खासदार झालात. 1993 साली पुन्हा आमदार झालेत. एवढेच नव्हे तर 1999 पासून 2014 पर्यंत मंत्रिमंडळातील सर्व महत्वाची खाती तुमच्याकडेच होती. तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती, तरीही शरद पवारांनी ती चूक पाठीशी घातली ही शरद पवारांची मोठी चूक होती असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

…तर जितेंद्र आव्हाडांना पक्षात ठेवलं असतं का?

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही (अजित पवार) पक्षात असताना कुठे- कुठे निघाले होते. त्याच चुका जितेंद्र आव्हाडांनी केल्या असत्या तर पक्षात ठेवलं असतं का? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. आमच्याबद्द काय खोटंनाटं जाऊन सांगायचे शरद पवारांना हे का आम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त तेवढं काम होतं. त्याचा मी पुरावा आहे. हे माझ्याबाबतीतच घडलं आहे.

छगन भुजबळांनी शपथ घेऊन सांगावं…

पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छगन भुजबळांनी शपथ घेऊन सांगावं की, ओबीसींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थांबविला होता की नाही तर? आदिवासी मंत्री होते गावीत त्यांनीही सांगावं की, आदिवासींचा निधी थांबविला होता की नाही? एससी, एसएसटी, ओबीसी या तिन्ही समाजाचा निधी थांबविण्याचं काम काय अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या अजित पवारांनी केलेलं आहे. हे काय सांगता आम्हाला असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. जातीयवाद पाळणारा नेता कोणी असेल तर ते अजित पवार आहेत. अशीही टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -