Balasaheb Thackeray Speech: बाळासाहेबांची गाजलेली भाषणं; पाहा व्हिडिओ

Balasaheb Thackeray Speech: बाळासाहेबांची गाजलेली भाषणं; पाहा व्हिडिओ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रकार, पत्रकार ते शिवसेना प्रमुख पर्यंतचा थक्क करणारा जीवन प्रवास नेहमीच लक्षात राहणारा आहे. मराठी माणसांच्या हितासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. मराठी माणसांच्या अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे लढले. बाळासाहेब व्यंगचित्रकार, पत्रकार म्हणून प्रसिद्ध होतेच. पण, ते उत्तम वक्ते म्हणून देखील लोकप्रिय होते. त्यांच्या भाषणाने सबंध शिवसैनिकांमध्ये नवी स्फूर्ती निर्माण व्हायची. बाळासाहेब ठाकरे यांचं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… या वाक्यानं त्यांच्या भाषणाची सुरुवात व्हायची आणि शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य निर्माण व्हायचं.

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना केली. मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. पक्षाचा स्थापना केल्यापासून २०१२ पर्यंत बाळासाहेबांनी पक्षाची कमान सांभाळली. या कालावधीत पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान आहे.

शिवसेनेचा दबदबा राज्यात कायम आहे. लाखो शिवसैनिकांचा पाठींबा बाळासाहेबांना होता पण हा आधार टिकवून ठेवणं हे काम त्यांनी नेहमीच केलं. तसंच ठाणे हे माझं आवडते शहर असल्याचा उल्लेख बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणातून केला होता. या ठाण्याने शिवसेनेचा पहिला झेंडा फडकविला, तर पहिला नगराध्यक्ष ही ठाण्यातून निवडणून आल्याचा अभिमान बाळासाहेबांनी त्यावेळी व्यक्त केला होता.त्यामुळे कोणतीही सभा घेण्यापूर्वी मी ठाण्यात येऊन नंतरच शिवतीर्थीवर जातो असं छातीठोकपणे जमलेल्या तमाम शिवसैनिकांना संबोधून सांगितले. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांची काही गाजलेली भाषणे आपण पाहूयात.

बाळासाहेब ठाकरे यांचं ठाणे येथे झालेलं शेवटचं तडफदार भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. या भाषणादरम्यान बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टीका केली होती.

३१ मे २००० मध्ये षणमुखानंद हॉलमध्ये बाळासाहेबांचं भाषण होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत मच्छिंद्रनाथ, गोपीनाथ मुंडे यांची सुद्धा उपस्थित होते.

बाळासाहेबांची बहुतांश भाषणं ही शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर व्हायची.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्फुर्तिस्थान मानून शिवसेनेने नेहमीच त्यांचं कार्य केलं आहे. विधानसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर त्याचा शपथविधी सोहळा हा शिवतीर्थावरच होणार असं वचन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिलं होतं.


हेही वाचा – शिवसेनाप्रमुखांच्या भव्य पुतळ्याचं आज अनावरण; पवार, उद्धव आणि राज येणार एकत्र


 

First Published on: January 23, 2021 10:24 AM
Exit mobile version