घरमहाराष्ट्रशिवसेनाप्रमुखांच्या भव्य पुतळ्याचं आज अनावरण; पवार, उद्धव आणि राज एकत्र

शिवसेनाप्रमुखांच्या भव्य पुतळ्याचं आज अनावरण; पवार, उद्धव आणि राज एकत्र

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या आज अनावरण होणार आहे. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज शनिवारी संध्याकाळी ६ वाजता एकाच व्यासपीठावर येणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसेवक आशिष चेंबुरकर आदींनी आढावा घेतला.

मुंबई महापालिकेच्यावतिने दक्षिण मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. बाळासाहेब यांची आज ९५ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत रिगल सिनेमाजवळ बसविण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होत आहे. जोगेश्वरीच्या मोतोश्री क्लब मौदानात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

असा आहे दिमाखदार पुतळा

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतिने करण्यात आली आहे.
  • पुतळा ९ फूट उंच असून तो १४ फूट उंचीच्या चबुतरावर बसविण्यात आला आहे. हा पुतळा बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आली आहे.
  • पुतळा शिल्पकार शशिकांत वडके यांनी बनवला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -