संजय राठोड शिंदे सरकारमध्ये गेल्यावर निष्कलंक झाले असतील, बाळासाहेब थोरातांची उपरोधिक टीका

संजय राठोड शिंदे सरकारमध्ये गेल्यावर निष्कलंक झाले असतील, बाळासाहेब थोरातांची उपरोधिक टीका

बाळासाहेब थोरात

जळगाव  – महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने राज्यभरात शिंदे सरकारवर टीका होत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात एकही महिलेला स्थान नाही. मात्र, महिला अत्याचाराचे ज्यांच्यावर आरोप झाले. अशांना मंत्रीमंडळात स्थान दिले. हे दुर्देवी आहे. दुसरीकडे संजय राठोड हे शिंदे सरकारमध्ये गेल्यावर निष्कलंक झाले असतील. संजय राठोड यांच्याबद्दल पक्षात नाराजी असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांना मंत्रीपद द्यायचे. हे जनता पाहत आहे. आगामी काळात जनता योग्य तो निर्णय घेईल, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा –

विरोधी पक्ष नेते पदावरून काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सागितले. महाविकास आघाडीत एकत्र असताना त्यांनी उमेदवाराचे देणे चुकीचे आहे. याबद्दल आमची नाराजी असून आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे मदत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा असल्याचे स्पष्ट केले.

भाजपानेच संपूर्ण जनतेला धोका दिला –

बिहारमधील राजकारणावर बोलतांना बाळासाहेब थोरात यांनी  भाजपानेच संपूर्ण जनतेला धोका दिला आहे आणि देत आहे. महागाई आणि बेरोजगारी दूर करण्याच्या घोषणा भाजपने केल्या. मात्र, त्याउलट प्रचंड महागाई झाली, बेरोजगारी वाढते आहे. केवळ आश्वासने देवून भाजपने सत्ता मिळवली व जनतेला भाजपने धोका दिला. त्यांना काय कोण धोका देणार, अशी टीका भाजपवर केली.

First Published on: August 10, 2022 6:30 PM
Exit mobile version