बारामतीत इलेक्ट्रॉनिक मॉलला भीषण आग

बारामतीत इलेक्ट्रॉनिक मॉलला भीषण आग

बारामतीत इलेक्ट्रॉनिक मॉलाल भीषण आग

बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये संपूर्ण मॉल जळून खाक झाला आहे. अचानक आग लागून आगीने रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.

महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीमध्ये मॉलमधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. सुदैवाने या आगीमध्ये जिवीतहानी झाली नाही.

First Published on: May 12, 2019 12:27 PM
Exit mobile version