बारामतीत सीआरपीएफ जवानाला पोलिसांची मारहाण

बारामतीत सीआरपीएफ जवानाला पोलिसांची मारहाण

सीआरपीएफ जवान अशोक इंगवले

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच बारामतीत एका सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. एका खोलीमध्ये डांबून १० ते १५ पोलिसांनी मला मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला आहे. या घटनेनंतर बारामतीमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अशी घडली घटना

दुचाकीवरुन ट्रीपल सीट का आलात अशी विचारणा करत अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत डांबून मारहाण केली. त्यांच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेमुळं बारामती तालुका पोलीस ठाण्यात युवकांनी मोठी गर्दी केलीय. दरम्यान, याबाबत सीसीटिव्ही फुटेज पाहून वस्तुस्थितीनुसार कारवाई करु असं पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शोकसभेसाठी परवानगी मागण्यासाठी अशओक इंगवले गेले होते.

कारवाईची मागणी 

मुळाच सीआरपीएफच्या वर्दीमध्ये असतानाच या जवानाला मारहाण करण्यात आली आहे. या वर्दी देखील फाडल्याचा आरोप जवानाने केला आहे. दरम्यान, मारहाणीमध्ये जवानाचा मोबाईल देखील फुटला आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

First Published on: February 17, 2019 4:29 PM
Exit mobile version