बार्ज पी-३०५ दुर्घटना, मविआ नेत्यांकडून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

बार्ज पी-३०५ दुर्घटना, मविआ नेत्यांकडून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

बार्ज पी-३०५ दुर्घटना, मविआ नेत्यांकडून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा तडाखा देशातील पाच राज्यांना बसला आहे. या तडाख्यामध्ये अरबी समुद्राताली बार्ज पी-३०५ या तराफ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरुन त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदा अरविंद सावंत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. राज्यात अशा प्रकारची दुर्घटना घडली असती तर सर्वात पहिले भाजप नेत्यांनी सरकारमधील नेत्यांचा राजीनामा मागिताल असता असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार सचिन सावंत यांनी बार्ज दुर्घटनेमध्ये पेट्रेलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ओएनजीसी(ONGC) पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आहे. भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी का करत नाही आहेत. या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे? या दुर्घटनेमध्ये मोठी हानी झाली आहे. तात्काळ याबाबत कारवाई करुन दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबीयांना मदत करावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

काँग्रेसकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

ओएनजीसी बार्ज बुडून ३७ कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू अत्यंत दुःखद आहे. ही मानवनिर्मित दुर्घटना आहे. ताऊक्ते चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा आधीच दिला होता. धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. ७०० कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. असे ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याबाबत तपास करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम विभागाकडून उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, ही मानवनिर्मित दुर्घटना आहे.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचा हल्लाबोल

तौक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला त्यामुळे ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तौक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? असा सवालही बुधवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. दरम्यान बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर रात्री धर्मेद्र प्रधान चौकशी समिती नेमत आहेत. या चौकशी समितीने काही होणार नाही. जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

कशी घडली बार्ज दुर्घटना

तौत्के चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात असलेल्या बार्ज पी- ३०५ ला मोठा फटका बसला आहे. समद्रात उंच उठत असेल्या लाटांमुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे हा तराफा पाण्यात बुडाला होता. तराफ्यावरील २६१ कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी जीवन रक्षक जॅकेट घातले. यातील काही कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेतल्या यामुळे ३७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यातील १८८ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

First Published on: May 20, 2021 5:54 PM
Exit mobile version