विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास नकार देणार्‍या कर्मचार्‍यास मारहाण

विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास नकार देणार्‍या कर्मचार्‍यास मारहाण

Petrol Pump

पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या वाहनधारकास हेल्मेट नसल्याने पेट्रोल देण्यास पंपावरील कर्मचार्‍याने नकार दिल्याने वाहनधारकाने कर्मचार्‍यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. म्हसरूळ येथील पेट्रोल पंपावर ही घटना घडली. या घटनेची पोलीस आयुक्तांनी तात्काळ दखल घेतली थोडयाच वेळात आयुक्त पाण्डेय या पंपावर भेट देणार आहेत.

म्हसरूळ येथील दिंडोरी रोड परिसरात असलेल्या इच्छामणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांकडे हेल्मेट नसल्याने येथे पेट्रोल भरणारा कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (वय २४) याने पेट्रोल दिले नाही, म्हणून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी या कर्मचार्‍याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तसेच दगड मारून प्रचंड दुखापत केल्याने सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे, सदर घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. अशीच एक घटना खुटवडनगर येथे घडल्याचे समोर आले आहे. पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट वाहन चालकाकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचा तसेच पोलिसावर हात उचलल्याचा प्रकार घडला असून संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

वाढते अपघाताला आळा घालण्यासाठी शहरात पोलीस आयुक्तालयाच्यावतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहीम सुरू करण्यात आली. मात्र यातूनही पळवाटा शोधत अनेक वाहन चालक पेट्रोल पंपावर फक्त हेल्मेटचा जुगाड करुन पेट्रोल भरून घेतांना दिसून येतात. मात्र आता पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी नियमांचेउल्लंघन करणार्‍यांविरोधात सक्त कारवाई करण्याच्या सूचना नाशिक पोलिसांना दिल्या आहेत. आता शहरात विना हल्मेट फिरणार्‍यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

First Published on: August 19, 2021 12:16 PM
Exit mobile version