बीडमध्ये महिला नायब तहसीलदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; आरोपी फरार

बीडमध्ये महिला नायब तहसीलदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; आरोपी फरार

महिला नायब तहसीलदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. बीडच्या केजमधील महिला नायब तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना भररस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आशा वाघ असे नायब तहसीलदाराचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, आशा वाघ यांच्या भावानेच हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. (beed attempt was made to burn naib tehsildars in beed by dousing with petrol)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ल्या झाला. आशा वाघ दुपारच्या सुमारास स्कूटीवरून तहसील कार्यालयाकडे जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना अडवले व त्यामधील एका महिलेसह अन्य चार जणांनी त्यांच्या हल्ला केला. पाच जणांनी बाटलीतून आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे केसमध्ये खळबळ माजली आहे. आशा वाघ या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.

आशा वाघ यांच्यावर कोणी हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामागे त्यांच्या भावाचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र वाघ यांच्यावर यापूर्वी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मधुकर वाघ सध्या तुरुंगात आहेत. पण आजचा हल्ला त्याच्या कुटुंबियांनी केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पोलीस या घटनेचा तपास करत असून हल्लेखोर फरार झाले आहेत.


हेही वाचा – बाळासाहेबांच्या घटनेवर आधारित आम्ही सर्व गोष्टी केल्या, राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया

First Published on: January 20, 2023 10:01 PM
Exit mobile version