धक्कादायक! वडिलांनी केला ६ वर्षाच्या निष्पाप मुलीचा खून, चिमुरडीला गळा दाबून संपवलं

धक्कादायक! वडिलांनी केला ६ वर्षाच्या निष्पाप मुलीचा खून, चिमुरडीला गळा दाबून संपवलं

Police in Maharashtra s Thane district murdering a 25 year old youth Aakash Thube lives in vasant Vihar area

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा काळजाचा ठोका उडवणारा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. वडिलांनी सहा वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. मुलीचे आजारपण सहन न झाल्याने वडिलांनीच तिची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने बीड हादरुन गेले आहे.

नेमके काय घडले?

बीडमधील वडवणी गावात असलेल्या फुल विक्रेत्याची सहा वर्षांची मुलगी सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. कुटुंबाने आसपासच्या परिसरात चिमुरडीचा शोध घेतला. मात्र, चिमुरडी कुठेच आढळली नाही. त्यामुळे सर्वच चिंतेत होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गावाशेजारील वाड्यात चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मुलीचा मृतदेह पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर कोणतेही दुख दिसले नाही. त्यामुळे पोलिसांना मुलीच्या वडिलांचा संशय आला. त्यानंतर त्यांनी त्याची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान, वडिलांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मुलगी सतत आजारी असायची आणि तिचे आजारपण असह्य झाल्याने खून केल्याची कबुली मुलीच्या आरोपी वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


हेही वाचा – अँटॉप हिल परिसरात पोलिसांवर कोयत्याने हल्ला; चार पोलीस गंभीर जखमी


 

First Published on: May 15, 2020 1:15 PM
Exit mobile version