पंतप्रधानांच्या भेटीआधी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

पंतप्रधानांच्या भेटीआधी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

Mumbai Sharad Pawar Uddhav Thackeray s review of preparations for opposition s India Aghadi meeting

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तब्बल १ तास चर्चा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यापुर्वी शरद पवार यांच्यासोबत मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. मराठा आरक्षण विषयक समितीचे सदस्यही या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षण आणि उद्याच्या मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वपुर्ण आहे.

मराठा आरक्षणावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधा कार्यालयता पंतप्रधान मोदींची भेट मागितली होती. यावर मुख्यमंत्र्यांना उद्याची म्हणजेच मंगळवारची भेट दिली आहे. यामुळे मराठा आरक्षण,कोरोना संकट, चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई, जीएसटी परतावा, ओबीसी आरक्षण अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली होती. केंद्र सरकारसोबत वाढलेला संवादातून अधिक मदतीचा अग्रह कसा धरता येईल यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा अशा अनेक विषयांवर रणनिती आखण्यात आली असल्याची चर्चा आहे. या बैठकीला काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मराठा आरक्षण समितीचे सद्य एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळही बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री घेणार पंतप्रधानांची भेट

द्धव ठाकरे दिल्लीला मोदींची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत असणार असल्याची माहिती मिळाली आहे.

First Published on: June 7, 2021 8:30 PM
Exit mobile version