अब्दुल सत्तारांवर कारवाई करा, राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

अब्दुल सत्तारांवर कारवाई करा, राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळलं आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रामध्ये कोणतीही खळबळ उडाली नाही. मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोके घेतले म्हणून बदनाम करत आहे, ते भिकारXXX आहे. ते मग कुणीही असेल, असं सत्तार म्हणाले होते. त्यानंतर या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तार यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र, आता अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घेतली असून राज्यपालांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं अब्दुल सत्तार यांची राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यामुळं अब्दुल सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.

काय म्हणाले होते सत्तार?

खोके घेतले अशा शब्दांत जर कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. मी जे बोलतोय खरं आहे. तुम्ही एका व्यक्तीचे नाव कशाला घेता. आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे. त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती, समृद्धी महामार्गाची केली पाहणी


 

First Published on: December 4, 2022 4:32 PM
Exit mobile version