विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेची निवडणूक २० जून रोजी पार पडणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार असून ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे.

राज्यसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीने पुन्हा दगाफटका होऊ नये म्हणून आतापासून कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्यासाठी भाई जागताप यांनी भेट घेतली आहे. कारण बहुजन विकास आघाडीची तीन मतं महाविकास आघाडीला मिळाल्यास विजयाला गवसणी घालणं अधिक सोप होऊ शकतं. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी भाई जगताप यांना आपलं मतं द्यावं, अशी विनंती केल्याचं सांगितलं जात आहे.

या निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २७ मतांची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ आहे. परंतु काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ संख्याबळ नसल्यामुळे त्यांना अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आता अपक्षांची मनधरणी सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कॉंग्रेसला चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.


हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची कसोटी; पटोले, थोरात, चव्हाण यांच्यावर जबाबदारी


 

First Published on: June 14, 2022 9:44 PM
Exit mobile version