तुम्हाला खरचं अडथळा येतोय की, शिवसेनेला ठोकायचंय, भास्कर जाधवांचा गडकरींना सवाल

तुम्हाला खरचं अडथळा येतोय की, शिवसेनेला ठोकायचंय, भास्कर जाधवांचा गडकरींना सवाल

तुम्हाला खरचं अडथळा येतोय की, शिवसेनेला ठोकायचंय, भास्कर जाधवांचा गडकरींना सवाल

शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. काही काम देखील या लोकप्रतिनिधींनी बंद पाडली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांना पत्राद्वारे सांगितले आहे. या पत्रावरुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी गडकरींवर निशाणा साधला आहे. महामार्गाच्या कामात तुम्हाला खरचं अडथळा येत आहे की, शिवसेनाला संधी मिळेल तिथे ठोकायचं आहे? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला ते आमदार तुमच्या पक्षाचे आहेत. शिवसेनेकडून असं काही करण्यात आलं नाही असेही भास्कर जाधव यांनी म्हणत गडकरींच्या पत्रावर टीका केली आहे.

भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रावर टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की, नितीन गडकरी यांना पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे आणि गडकरी यांच्यात एकमेकांप्रति आदराची भावना आहे. गडकरी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना फोन करुन सांगू शकत होते. पण हे पत्र माध्यमांसमोर का आलं? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.

भास्कर जाधव यांनी पुढे म्हटलं आहे की, तुम्हाला खरच अडथळा येतोय म्हणून मार्ग काढायचा आहे की, संधी मिळेल तिथे शिवसेनेला ठोकायचं आहे? असाही सवाल भास्कर जाधव यांनी केलाय, ज्यांनी सिंधुदुर्गामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला ते आमदार तुमच्या पक्षाचे आहेत. शिवसेनेनं असं काही केलं असल्याचे मला तरी आठवत नाही अशी आठवणही भास्कर जाधव यांना करुन दिली आहे. तसेच जर गडकरींनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असती तरी आदराची भावना वाढली असती असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

गडकरींनी पत्रात काय म्हटलं

केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषत: विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडत असल्याचे नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा : शिवसेनेच्या दहशतीमुळे काम बंद पडतील, गडकरींनी पत्रात काय म्हटलंय वाचा


 

First Published on: August 16, 2021 7:55 PM
Exit mobile version