Bhima Koregaon case: आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवस

Bhima Koregaon case: आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवस

भीमा-कोरेगाव हिंसाचार

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालयाने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत वाढ दिली आहे. भीमा – कोरेगाव प्रकरणामध्ये वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरूण फरेरा आणि वर्नन गोन्स्लाविस यांना अटक केली आहे. हे चारही जण कोठडीमध्ये आहेत. भीमा-कोरेगाव प्रकरणी माओवाद्यांशी संबध असल्याचा आरोप करत पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. या पाचही संशयितांच्या विरोधात तपास करुन आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला आणखी ९० दिवसांची मुदत मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यासा आता पुणे सत्र न्यायालयाने मंजुरी दिली आहे. ऑगस्टमध्ये पोलिसांनी हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान एल्गार, परिषदेला माओवाद्यांनी पुरवली होती. त्यामध्ये या चारही जणांचा सहभाग होता या संशयावरून अटक करण्यात आली होती.
दरम्यान, एल्गार परिषदेनंतर भीमा – कोरेगावमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये काही एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान देखील झालं होतं.
First Published on: November 26, 2018 9:31 PM
Exit mobile version