सत्तेत गेलो म्हणून भूमिका बदलली नाही, ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांचे स्पष्टीकरण

सत्तेत गेलो म्हणून भूमिका बदलली नाही, ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांचे स्पष्टीकरण

त्र्यंबकेश्वर : फुले, शाहू, आंबेडकरांबाबची भूमिका बदलणार नाही, असे म्हणून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राम्हणांबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. कोणत्याही समाजाचा अपमान करण्याची भावना नव्हती, असे भुजबळ म्हणाले. भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे हे मनोहर कुलकर्णी नाव का लावतात?, असे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ब्राम्हण समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले, “मी सरकारमध्ये आहे म्हणून माझी भूमिका बदलणार नाही. मी आजही त्याच भूमिकेवर ठाम आहे. मी आजही फुले, शाहू, आंबेडकरांबातची भूमिका बदलणार नाही. पण, कुठल्यासमाजाचा आपमान कोणताही हेतू नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांना दिले. भुजबळ पुढे म्हणाले, “महात्मा फुल्यांना भिडेंनी वाडा दिला आणि तिथे शाळा सुरू करणे शक्य झाली. चिपळूणकर त्यांच्याबरोबर होते. अण्णासाहेब कर्वेंनी पुढे काम केले. ते ब्राम्हण आहे म्हणून विरोध आहे, असे नाही. पूर्वी ब्राम्हणांच्या मुलींना सुद्धा शिक्षण नव्हते. ते सावित्रबाई फुले आणि महात्मा फुल्यांनी सुरू केले. जो काही ऐतिसाहिक पुरावे आहेत. त्यावर चर्चा करता येईल.”

कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. महात्मा फुल्यांना भिडेंनी वाडा दिल्यानंतर शाळा सुरू झाली. चिपळूणकर त्यांच्याबरोबर होते. अण्णासाहेब करवे यांनी पुढे काम केले. यांच्याबद्दल ते ब्राम्हणा आहेत म्हणून विरोध आहे, असे नाही. मी नक्की म्हणालो की, पूर्वी ब्राम्हणांच्या मुलींना सुद्धा शिक्ष नव्हते. ते सावित्र फुले आणि माहत्मा फुलेंनी सुरू केली. ऐतिहासिक पुराव्यावर चर्चा करता येईल.

 संभाजी भिडें नाव बदलण्याची गरज का भासली?

संभाजी भिडे त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे हे आधी स्पष्ट करा. जर ते मनोहर कुलकर्णी आहेत. मग संभाजी नाव घेण्याची आवश्यकता का भासली?, आपापल्या नावाने प्रबोधन करा. पण हे नाव घ्यायचे आणि बहुजन समाजात जायाचे, ते बरोबर होत नाही, आणि संभाजी भिडे हे नाव घेऊन काय प्रसार करतात. ते तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना आम्ही विरोध करणार.

 

हेही वाचा – ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात; भिडेंवर टीका करताना छगन भुजबळ असे का म्हणाले?

छगन भुजबळ नेमके काय म्हणाले…

ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असे सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असे विधान करत छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांना टोला लगावला. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, आपल्याला शिक्षण दिले. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांनी. त्याचे कायद्यात रुपांतर केले ते बाबासाहेब आंबेडकर यांनी. भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली. बाकीच्यांना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काही पाहिले नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिले नाही.

First Published on: August 20, 2023 12:13 PM
Exit mobile version