घर उत्तर महाराष्ट्र ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात; भिडेंवर टीका करताना छगन भुजबळ असे...

ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात; भिडेंवर टीका करताना छगन भुजबळ असे का म्हणाले?

Subscribe

नाशिक : ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असे विधान करत छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांना टोला लगावला. त्यामुळे नव्या वादाला फोडणी बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मविप्र समाज दिन सोहळयानिमित्त मखमलाबाद शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, आपल्याला शिक्षण दिले. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांनी. त्याचे कायद्यात रुपांतर केले ते बाबासाहेब आंबेडकर यांनी. भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली. बाकीच्यांना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काही पाहिले नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिले नाही.

- Advertisement -

बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह ज्या कर्मवीरांनी योगदान दिले ही सर्व माझी दैवत आहेत. शिक्षणासाठी योगदान देणारे हे सर्व महापुरुष आपल्या सर्वांची दैवत असली पाहिजे असे सांगत आपण कुठेही गेलो तरी त्यांचे विचार कदापिही सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, संचालक रमेश पिंगळे, लक्ष्मणराव लांडगे, आप्पासाहेब पिंगळे, पंडिततात्या पिंगळे आदी संचालक उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये 

यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. त्यांचे नाव संभाजी भिडे नव्हे संभाजी कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटू नये. ब्राह्मण समाजात संभाजी शिवाजी असे नाव ठेवत नाही. भिडे म्हणतो, माझ्या बागेतील अंबे खा, मुले होतील. मग मेडिकल कॉलेज कशाला? बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता

- Advertisement -

मी ब्राह्मणांवर टीका करत नाही. ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही आम्ही शुद्र. त्यानंतर मग अतिशुद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित होते असेही भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -