राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठा धक्का, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठा धक्का, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. परंतु राज्यातील सत्तातरानंतर जिल्ह्याचे खासदार, आमदार आणि माजी नगरसेवकांसह पदाधिकारी हे पक्षांतर करताना दिसत आहेत. यावेळी परभणी जिल्ह्यातील काही नगरसेवक, पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील तब्बल १०१ सरपंच, ३४ माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी काल रात्री हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेससोबतच काँग्रेसला दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

परभणीतील शिवसेना युवानेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या सर्वांनी भगवा झेंडा हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी, काँग्रेससह विविध पक्षातील १०१ ग्रामपंचायतीचे सरपंच, ३४ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालेल्या नाशिकच्या राजकारणातून एका माहिती समोर आली होती. माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अमृता पवार या भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.


हेही वाचा : धक्कादायक घटना! मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू


 

First Published on: March 28, 2023 4:16 PM
Exit mobile version