Politics : उद्धव ठाकरे, पवारांचा दबाव, निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Politics : उद्धव ठाकरे, पवारांचा दबाव, निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुंबई : काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वीच भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंवरही निशाणा साधला. (Big earthquake in Maharashtra after election Ashok Chavan)

भाजपामध्ये जाण्याच्या निर्णयावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपामध्ये मला पूर्ण मानसन्मान मिळत आहे आणि पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती मी चोखपणे पूर्ण पार पाडतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा माझा हात धरत लोकांना अभिवादन केलं, तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता. मी भाजपात येण्याआधी मोदींना बऱ्याच वेळेला भेटलो आहे. पण, बऱ्याच भेटींबद्दल कॅमेरासमोर बोलता येत नव्हते. पण आता भाजपात आपण समाधानी आहोत. देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतदानाचा टक्का वाढावा म्हणून… काही ठिकाणी न्याहारी तर, काही ठिकाणी बक्षीस

ठाकरे-पवारांच्या दबावाखाली काँग्रेस नेते झुकले (Congress leaders bowed down under the pressure of Thackeray-Pawar)

नाना पटोले सगळं स्वःताच्या इच्छेनुसार करतात.कोणाला ही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा आहेत, पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचे वाटप झाले, आणि उमेदवारही घोषित झाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्,या त्या घेतल्या आणि जे उरलं सुरलं आहे ते कांग्रेसला मिळालं. राज्य नेतृत्वाने याबाबत काहीच केलं नाही.मी जर कांग्रेसमध्ये असतो तर हे होऊच दिलं नसतं, असेही चव्हाण यांनी म्हटले.

काँग्रेस सोडण्याच कारण सांगितलं (The reason for leaving the Congress was given)

ज्या पक्षाचं भविष्य नाही, त्या पक्षात आपलं भविष्य काय होणार? असा प्रश्न उपस्थित करत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलं. त्यांनी म्हटले की, जिंकण्याची जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची पक्ष नेतृत्वालाच इच्छा नाही, तिथे थांबून मी काय करणार? खरं तर काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी विद्यमान नेतृत्वच जबाबदार आहे. नाना पटोलेंसारखे थोर विद्वान जर पक्ष चालवत असतील तर त्या पक्षाचे काय होणार? असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या प्रचार गीताचा आयोगाकडून पुनर्विचार; ठाकरे गटाला दिलासा मिळणार?

अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडायची जुनी सवय (An old habit of blaming others for failure)

अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला जागावाटपात नुकसान झाल्याचा आरोप नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेते करत आहेत. यावर भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले की, मी निघाल्यानंतर नाना पटोले आणि इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासमोर हिंमत दाखवत जागा मागून का घेतल्या नाहीत? स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडायची यांची जुनी सवय आहे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 24, 2024 10:50 PM
Exit mobile version