घरदेश-विदेशLok Sabha 2024 : मतदानाचा टक्का वाढावा म्हणून... काही ठिकाणी न्याहारी तर,...

Lok Sabha 2024 : मतदानाचा टक्का वाढावा म्हणून… काही ठिकाणी न्याहारी तर, काही ठिकाणी बक्षीस

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहारमधील चार जागांवर 50 टक्क्यांहून कमी मतदान झाल्यामुळे चिंतेत पडलेल्या निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढवण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा राजकीय ज्वर दिवसेंदिवस चढत असला तरी, मतदारांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे पहिल्या टप्प्यात दिसले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्यस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी सकाळच्या न्याहारीची व्यवस्था करण्यात आली आहे तर, काही ठिकाणी बक्षिसांचे प्रलोभन ठेवण्यात आले आहे.

नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी इंदूर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक व्यावसायिक संघटनांनी अनोखी शक्कल लढविली आहे. शहरातील मतदारांना पोहे- जिलेबी, नूडल्स, मंच्युरियन याच्याबरोबरच आईस्क्रीम आणि शीतपेयही मोफत दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी आशिष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या ‘मतदार जागृती संवाद’मध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी शहरातील विविध व्यापारी संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या प्रचार गीताचा आयोगाकडून पुनर्विचार; ठाकरे गटाला दिलासा मिळणार?

शहरातील शॉप असोसिएशनने 13 मे रोजी सकाळी 7 ते 9 या कालावधित मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांना पोहे-जिलेबी देण्यात येणार आहे. तर, प्रथमच मतदान युवक-युवतींना मोफत आईस्क्रीमही मिळणार आहे. याशिवाय कृष्णपुरा छत्री रोड बजरंग मंदिरजवळील चॉईस चायनीज सेंटरतर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांना मोफत मंच्युरियन आणि नूडल्स देण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने मतदारांना सावलीसाठी मंडप, पिण्याचे थंड पाणी, पंखे-कूलर उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

- Advertisement -

बिहारमध्ये बक्षिसांची घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहारमधील चार जागांवर 50 टक्क्यांहून कमी मतदान झाल्यामुळे चिंतेत पडलेल्या निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढवण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला आणि ओल्या बाळंतिणींना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी तसेच पुन्हा घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय 2019च्या तुलनेत 10 टक्के किंवा त्याहून अधिक मतदान करवून घेणाऱ्यांना 5000 ते 500 रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. बीएलओ, जीविका दीदी, विकास मित्र, शेतकरी सल्लागार आणि इतर मतदान कर्मचारी यांना याचा लाभ होणार आहे. सर्व जिल्हाधिकारी आपापले विजेते निवडतील. प्रथम पारितोषिक 5000 रुपये, द्वितीय 3000 रुपये आणि तृतीय 2000 रुपये असेल. याशिवाय आणखी दहा लोकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 500 रुपये रोख दिले जातीलल.

किशनगंज, पूर्णिया, कटिहार, भागलपूर आणि बांका येथे 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत यासंबंधीचे निर्देश दिले. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 48.23 टक्के मतदान झाले. 2019मध्ये पहिल्या टप्प्यात चार जागांवर 53.47 टक्के मतदान झाले होते.

हेही वाचा – Lok Sabha : हिंदूंची मालमत्ता अल्पसंख्यकांना देण्याचा काँग्रेसचा डाव; अमित शहांनी कॉंग्रेसवर तोफ डागली


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -