मोठी बातमी: मुख्यमंत्री शिंदे राजभवनात दाखल; रमेश बैस यांची घेतली भेट

मोठी बातमी: मुख्यमंत्री शिंदे राजभवनात दाखल; रमेश बैस यांची घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटील गेले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच, काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावरील निर्णय येण्याची शक्यता असताना, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.( Big news CM Shinde enters Raj Bhavan Met Ramesh Bais ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्नेहभोजनासाठी राजभवनात गेल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यपाल रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विशेष आमंत्रण धाडण्यात आलं होत, म्हणूनच मुख्यमंत्री स्नेहभोजनासाठी राजभवनात दाखल झाले आहेत. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता रमेश बैस यांची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट ही चर्चेचा विषय ठरली आहे.

शिंदेंसोबत इतिहासाची पुनरावृत्ती 

बऱ्याच दिवसांनंतर आता राजभवनावर अशी चहल-पहल पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भाजप असं राजभवनात जात होते, कारण त्यांना ठाकरे यांना पदावरुन काढायचं होतं. जर आता पुन्हा एकदा असचं होत असेल तर भाजप शिंदेंसोबत अशीच इतिहासाची पुनरावृत्ती करत आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

शरद पवार यांनी राजीनामा देणं, त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी, तसंच, राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायाचा लवकरच येणारा निकाल या सर्व गोष्टी अत्यंत बोलक्या आहेत आणि या सर्व पटावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेणं, या सर्व गोष्टी म्हणजे राज्यात मोठ्या सत्ताबदलाचे संकेत असल्याचं अंधारे म्हणाल्या.

राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित

राज्यात ज्याप्रकारे घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून जे बसले आहेत त्यांना असं वाटणं सहाजिकच आहे. परंतु राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री यांचा आजचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, अचानक ठरलेला नाही, असं शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

First Published on: May 4, 2023 9:21 PM
Exit mobile version