रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, ‘या’ तिकिटाचे दर पाचपटीने वाढले

रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, ‘या’ तिकिटाचे दर पाचपटीने वाढले

मुंबई –  कोरोना प्रादुर्भावामुळे पुकारलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात रेल्वेसेवेवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यान रेल्वेसेवा पूर्ववत होत आहे. तसंच, सणावाराच्या काळात लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही तुफान प्रतिसाद मिळत आहे. मुंबईसह अनेक स्थानकांवर गर्दी पाहायला मिळतेय. वाढती गर्दी पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटदरांमध्ये (Platform Ticket) वाढ केली आहे. ही वाढ तात्पुरत्या स्वरुपाची असून २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ही वाढ मर्यादित असणार आहे. ५० रुपये प्लॅटफॉर्म तिकिट करण्यात आल्याचं मध्य रेल्वेकडून (Central Railway) सांगण्यात आलंय.

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, लोकमान्य टीळक टर्मिनस, आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म दरात वाढ करण्यात आली आहे. तर, पश्चिम स्थानकावर मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उढना, सुरत या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म दरांत वाढ केली आहे. या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट ५० रुपयांना मिळेल, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिली आहे. पूर्वी ही तिकिट १० रुपये होती. त्यामुळे या तिकिटात तब्बल पाचपट वाढ करण्यात आली आहे.

First Published on: October 22, 2022 8:21 AM
Exit mobile version