पूर ओसरणार; अलमट्टीतून ५ लाख क्युसेक विसर्ग सुरु

पूर ओसरणार; अलमट्टीतून ५ लाख क्युसेक विसर्ग सुरु

अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे खुले आहेत. त्यामधून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली आहे. आज सकाळी ७ वाजता कोयना धरणामधून ७७,९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. हा विसर्ग वाढविल्यामुळे आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर ओसरण्यास मदत होणार आहे. कृष्णा नदीवर कर्नाटकात अलमट्टी धरण बांधण्यात आलेले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर कृष्णा नदी दुथडी भरून वाहते, अशा परिस्थितीत अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यास सांगली जिल्ह्यात पूर येतो.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ५२ फूट २ इंच असून, एकूण १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.३० टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव आणि जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

नदी आणि त्यावरील १०७ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील – राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर.

भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे.

कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे.

तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी.

वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी.

कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे.

दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी.

कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी.

वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ, वाण्याचीवाडी.

हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ.

घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.

ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी.

शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.

धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी

चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली)

नजिकच्या अलमट्टी धरणात 88.76 टीएमसी तर कोयना धरणात 103.19 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

First Published on: August 10, 2019 2:00 PM
Exit mobile version