महापालिकेची बायोमेट्रिक हजेरी बंद

महापालिकेची बायोमेट्रिक हजेरी बंद

मुंबई महानगर पालिका

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिका कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी येत्या ३१ मार्चपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना आता पुन्हा जुन्याच पध्दतीने नोंदवहीवर स्वाक्षरी करत हजेरी नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे महापालिका कर्मचार्‍यांसाठी ही आनंदाची बातमी असून करोनामुळे का होईना कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी बंद झाल्याचे समाधान कर्मचार्‍यांना लाभणार आहे.


हेही वाचाकरोना व्हायरस : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांचे पिंजरे बंद


 

भारत सरकारच्या आरोग्य व कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील कोविड-१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशानुसार बायोमेट्रिक प्रणालीमधून उपस्थितींची नोंद करणेपासून सूट मिळण्याबाबतच्या निर्देश देण्यात आले. ‘करोना’च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेतील सर्व कर्मचारी यांची बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीच्या वापराला ३१ मार्च पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

First Published on: March 15, 2020 10:31 PM
Exit mobile version